लखनौचा विजय   

अहमदाबाद : आयपीएलच्या 18 व्या हंगामात गुजरात टायटन्सचा संघ आणि लखनऊ सूपर जायंटस यांच्यात गुरुवारी झालेल्या सामन्यात लखनौचा सलामीवीर मिचेल मार्श याने शतक साकारले. त्याच्या या धमाकेदार कामगिरीमुळे लखनऊच्या संघाने 33 धावांनी सामना जिंकला.

मिचेल मार्श याने 64 चेंडूत 117 धावा केल्या. यावेळी त्याने 10 चौकार आणि 8 षटकार मारले. त्याला साथ देताना पुरन याने नाबाद 56 धावा केल्या. तर पंत याने नाबाद 16 धावा केल्या. अवांतर 10 धावा संघाला मिळाल्या. त्यामुळे लखनौच्या संघाने 20 षटकांत 235 धावा फक्त 2 फलंदाज गमावत केल्या.   लखनौचा मार्कराम 36 धावांवर बाद झाला. साई किशोर याने शाहरुख खान याला झेलबाद केले. तर निकोलस पुरन याने अर्धशतक केले.

लखनौच्या गोलंदाजांपैकी विल्यम ओरुके याने 3 फलंदाज तर आवेश खान याने 2 फलंदाज बाद केले. आयुष बडोनी याने 2 तर आकाश महाराज सिंग आणि शबाझ अहमद यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

 त्यानंतर 236 धावांचे आव्हान पार करण्यासाठी गुजरातचा संघ मैदानावर उतरला मात्र त्यांचा संपुर्ण संघ 20 षटकांत 202 धावांवर बाद झाला. सलामीवीर शुभमन गिल याने 35 धावा तर बटलर याने 33 धावा केल्या. साई सुदर्शन 21 धावांवर बाद झाला. रुदरफोर्ड याने 38 धावा केल्या. शाहरुख खानने 57 धावा करत अर्धशतक केले. राहुल तेवटिया याने 2 धावा तर राशीद खान याने 4, रबाडा 2 धावांवर बाद झाला.

संक्षिप्त धावफलक

लखनौ सूपर जायंटस  : मिचेल मार्श 117, पुरन 56, मार्कराम 36, पंत 16 अवांतर 10 एकूण 20 षटकांत 235/2

गुजरात टायटन्स : गिल 35, साई सुदर्शन 21, बटलर 33, रुदरफोर्ड 38, शाहरुख खान 57, राहुल तेवटिया 2, आर्शद खान नाबाद 4, रबाडा 2, अवांतर 8 एकूण 20 षटकांत 202/9

 

Related Articles